नारायण राणेंकडून शिवसेनेला खुलं आव्हान
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेला खुलं आव्हानंच दिलं आहे.
रत्नागिरी : शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध हे सिद्ध करून दाखवा, मी राजकीय जीवनातून निवृत्त होईन, असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेला खुलं आव्हानंच दिलं आहे.
सागवे कात्रादेवी येथे जाहीर सभा
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात येवू घातलेल्या पेट्रोकेमिक प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी नारायण राणे यांनी सागवे कात्रादेवी येथे एक सभा घेतली त्या सभेत ते बोलत होते.
शिवसेनेला राणेंचे तिखट सवाल
विशेष म्हणजे या सभेत नारायण राणे यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेने 15 दिवसांत प्रकल्प रद्द कारण्याची भाषा केली होती, त्याचं काय झालं असा सवाल देखील राणे यांनी उपस्थित केला.
प्रकल्पाला शंभर टक्के विरोधच-राणे
न्याय मिळेपर्यंत नाणारच्या जनतेसोबत असेन तुम्ही एकजूट अशीच दाखवा, माझा प्रकल्पाला शंभर टक्के विरोधच असणार असल्याची घोषणा यावेळी नारायण राणेंनी केली. तसेच पोलीस अधिकारी व राजापूरचे प्रांताधिकारी यांचा देखील सभेत नाराणय राणेंनी चांगलाच समाचार घेतला.