नवी दिल्ली : नारायण राणे यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंनीच प्रतिक्रिया दिली आहे.  काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. राणेंनी दिल्लीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. दोघांची दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनात भेट झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी नारायण राणेंची काँग्रेसमध्ये घरवापसी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.. काँग्रेसच्या राज्यातल्या पराभवामुळे काँग्रेस संघटनेत कमालीचं नैराश्य आलं आहे. त्यामुळे नारायण राणे काँग्रेसमध्ये परत जातील, अशी चर्चा होती. बुडत्या नावेत कोण बसणार, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनीही नारायण राणे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता फेटाळून लावली होती. आता खुद्द राणेंनीच काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.


लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांचा पराभव झाला होता. तर दुसरीकडे शिवसेनेशी युती केल्यामुळे भाजपला संपूर्ण राज्यभरात मोठे यशही मिळाले आहे. त्यामुळे नारायण राणे यांची मोठी कोंडी झाली आहे. नारायण राणे हे सध्या भाजपच्या तिकीटावर राज्यसभेचे खासदार आहेत.