कुडाळ :  राणे भाजपमध्ये जाणार... भाजपमध्ये जाणार अशा शक्यता अनेक दिवसांपासून व्यक्त होत आहे.  याबाबत नारायण राणे यांना विचारले असता आपल्या खास शैलीत नारायण राणे यांनी हा प्रश्न टोलवून लावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी चोवीस तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या अमित शाह मुलाखतीत आणि नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर अमित शाह यांनी म्हटले राणे आले तर विचार करू अशा शब्दात राणेंच्या संभाव्य प्रवेशावर भाष्य केले होते. 


या प्रश्नावर आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारल्यावर राणे म्हणाले, उदयजी यांनी अमित शाह यांना प्रश्न विचारला त्यावर शाह यांनी उत्तर दिले. मी त्यावर एक्स्पर्ट कमेंट काय करू? मिश्किल हास्य देत राणे म्हणाले  उत्तरावर उत्तर होऊ शकत नाही, प्रश्नावर उत्तर होऊ शकत !


भविष्यात काय घडेल यावर मला काही बोलायचे नाही, असे बोलून राणे यांनी प्रश्नाला बगल दिली.