Narayan Rane News :  मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेलं उपोषण तब्बल 17 दिवसांनी मागे घेतले आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी आग्रही मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत रोखठोक भूमिका मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरसकट कुणबी दाखले ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. मराठ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सर्व्हे करा आणि मगच प्रमाणपत्र द्या अशी मागणी  केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली. 


नेमकं काय म्हणाले नारायण राणे?


सरसकट मराठ्यांना कुणबी दाखला देऊ नये. सरसकट सर्वांना कुणबी दाखले द्यावेत अशी 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही, असे नारायण राणे म्हणाले. गरीब, गरजू मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. यापूर्वीच्या मराठा समाजातील मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देताना हात आखडता घेतला नाही. त्यामुळे इतरांनी पण आता मराठा समाजाला पाठिंबा देण्याची मागणी देखील नारायण राणे यांनी केली आहे. 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकार च्या वतीने देण्यात आले होता.  मात्र, हे कोर्टात टिकू शकले नाही. 


ओबीसींना मिळणारे फायदे मराठा समाजाला मिळवून देण्याचे सरकारचे प्रयत्न 


मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेलं उपोषण तब्बल 17 दिवसांनी मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांना आरक्षणाबाबत आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांसोबत गिरीश महाजन, दानवे, विखे पाटील, टोपे, सामंत, खोतकर, भुमरे उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. माझं वाटोळं झालं तरी चालेल मात्र, मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही असं जरांगे म्हणाले...तर ओसुरू असून, रद्द झालेलं आरक्षणही मिळवणार असं आश्वासन शिंदेंनी दिलंय.


जो ओबीसींवर अन्याय करेल त्याचा हात कापून टाकू  - ओबीसी महासंघाचा इशारा


जो ओबीसींवर अन्याय करेल त्याचा हात कापून टाकू असा इशारा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी दिलाय. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी तायवाडेंची मागणी आहे. त्यासाठी नागपुरात गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्यानं तायवाडेंनी सरकारविरोधात रोष व्यक्त केलाय. 400 जातींकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही, सरकार फक्त एका जातीमागे फिरतंय असं तायवाडेंनी आरोप केलाय.