Narendra Modi In Pune : पुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.   महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आणणारी भटकती आत्मा असं म्हणत पुण्याच्या सभेत शरद पवारांचं नाव न घेता मोदींनी हल्लाबोल केला. तर, खटाखट, टकाटक म्हणत राहुल गांधींची पंतप्रधान मोदींनी  खिल्ली उडवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील सभेत शरद पवारांचं नाव न घेता मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.  'भटकती आत्मा' अशा शब्दांत मोदींनी पवारांवर टीका केली. 'बड्या नेत्यामुळं महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण आहे. '45 वर्षांआधी एका नेत्याने राजकीय खेळ सुरु केला.  तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण आहे. 1995 महायुती सरकारवेळीही अस्थिरतेचा प्रयत्न झाला.  2019 मध्ये जनादेश धुडकावला असं म्हणत नाव न घेता मोदींनी पवारांवर टीका केली. 


नरेंद्र मोदी यांनी केली राहुल गांधींची नक्कल 


पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली. गरिबी कशी मिटवणार, राहुल म्हणतात खटाखट खटाखट. विकसित भारताचा काय प्लॅन, राहुल म्हणतात टकाटक, अशा शब्दांत मोदींनी राहुल यांची खिल्ली उडवलीय. राहुल गांधींमुळे नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये येत असल्याचा हल्लाबोलही मोदींनी केलाय.


धर्माच्या नावावर आरक्षण देऊ देणार नाही


धर्माच्या नावावर आरक्षण देऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कराडच्या सभेत ठणकावून सांगितलं. साता-यातील भाजप उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. येत्या महिनाभरात देशात अनुचित घटना घडवण्याचा कट असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी विरोधकांना उद्देशून केला.. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा


पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मोदींवर 6 वर्षं निवडणुकीवर बंदी घालण्याची याचिका दिल्ली हायकोर्टात करण्यात आली होती. मात्र ही याचिका हायकोर्टानं फेटाळली. मोदींच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेपाला दिल्ली हायकोर्टानं नकार देत, ही याचिका फेटाळून लावली.