शपथ ग्रहणासाठी मोदींनी 9 तारीखच का निवडली? रहस्य आलं समोर; प्रभू रामाशी आहे संबंध
Modi Swearing in Ceremony Update: नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी 9 जून, रविवार या दिवसाची निवड केली. यामागे कारण आहे.
Modi Swearing in Ceremony Update: देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे मोदी सरकार 3.0 देशाला पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी 9 जून, रविवार या दिवसाची निवड केली.
पण शपथविधी सोहळ्यासाठी मोदींनी रविवारचीच निवड का केली? असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण आता यामागचे रहस्य उघड झाले आहे. ज्योतिषांच्या सल्ल्यानंतर ही तारीख आणि हा दिवस निवडण्यात आल्याचे म्हटले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 9 जून रोजी मजबूत शुभ योग असू शकतो. ज्योतिषी डॉ. गौरव कुमार दीक्षित यांनी ही माहिती दिली. 9 जून 2024 रविवारी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी (विक्रमी संवत 2081) आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, असे ते म्हणाले.
सूर्य सरकारवर करतो राज्य
रविवार, 9 जून हा सूर्याचा दिवस आहे. केवळ सूर्य सरकारवर राज्य करतो. ज्योतिष शास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा आणि शासनाचा कारक मानला जातो, ज्योतिषी सांगतात. अंकशास्त्रानुसार 9 हा आकडा मंगळ ग्रह दर्शवतो. मंगळ हा उर्जेचा घटक आहे. सूर्य आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची जुळवाजुळव करून नवे सरकार स्थापन होईल, तेव्हा त्या सरकारला देशात आणि जगात नक्कीच यश मिळेल, असे ज्योतिषशास्त्र म्हणतं.
प्रभू रामाचा जन्मही याच नक्षत्रात
ज्योतिषी डॉ. गौरव कुमार दीक्षित सांगतात, रविवार पुनर्वसु नक्षत्र आहे. भगवान श्री राम यांचा जन्मही पुनर्वसु नक्षत्रात झाला होता. नरेंद्र मोदी हे भगवान श्रीरामाचे निस्सीम भक्त आहेत.पुनर्वसु नक्षत्रात जन्मलेले लोक नेहमी इतरांची सेवा करण्यास आणि चांगले कार्य करण्यास तयार असतात, असे म्हणतात. पुनर्वसु नक्षत्रात शपथ घेतल्यास सरकार या देशातील जनतेच्या हिताची आणि कल्याणाची सेवा करण्यास तत्पर असेल असे म्हटले जाते.
आज बनतायत 6 शुभ योग
पंतप्रधान मोदींच्या शपथविधीच्या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल 6 शुभ योगही घडत आहेत. रविवार ९ जून रोजी होणाऱ्या 6 शुभ योगांमध्ये पहिला वृद्धी योग, दुसरा पुनर्वसु नक्षत्र, तिसरा रविपुष्य योग, चौथा रवियोग, पाचवा सर्वार्थ सिद्धी योग आणि पाचवा योग आहे. सहावी म्हणजे तृतीया तिथी यांचा समावेश असल्याचे ज्योतिषी डॉ. तिवारी सांगतात.
मागील कार्यकाळाप्रमाणेच पुन्हा एकदा पंतप्रधानांनी शपथ घेण्यासाठी वृषभ राशीची निवड केली आहे. ही एक निश्चित चिन्ह, कुंडलीचे स्वर्गीय चिन्ह असून गुप्तपणे काम करणारी राशी असेही म्हटले जाते.