Chhagan Bhujbal Absent On Ajit Pawar Tour: उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नाव बदलून दिल्लीला जायचे आणि अमित शहांची भेट घ्यायचे असे वृत्त समोर आले होते. यावर सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी टीका केली होती. या आरोपात सत्यता आढळल्यास मी राजकारणातून सन्यास घेईन असे अजित पवार म्हणाले. याच पत्रकार परिषदेत त्यांना भुजबळांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नालादेखील अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांच्या दौऱ्यात छगन भुजबळांनी दांडी मारल्याची चर्चा सकाळपासून सुरु होती. येवला मतदारसंघात दौरा असल्याने उपस्थित राहू शकणार नसल्याचे छगन भुजबळ म्हणाले. तर माझा दौरा हा पूर्वनियोजित असल्याचे अजित पवार म्हणाले. 


काय म्हणाले अजित पवार?


काल मिटींग झाली तेव्हा भुजबळ माझ्या शेजारी होते. माझा कार्यक्रम एक महिन्यापुर्वी ठरला. मी आणि अदिती तटकरे आलोय. दुपारी अदिती तटकरेंना जायचंय कारण मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. आता उद्या हेडलाइन होईल, नाशिकच्या कार्यक्रमात अदित तटकरे होत्या. नंतर त्या नाराज होऊन गेल्या की काय? आम्ही सर्व एक परिवार म्हणून काम करतोय. त्यात काही असेल तर आम्ही सांगू. वेगवेगळ्या बातम्या काढणं हे पत्रकारांचं काम आहे पण त्या बातम्या विश्वासआर्हतेच्या असाव्यात, असे अजित पवार म्हणाले. 


अजित पवारांनी फेटाळल्या चर्चा 


लाडक्या बहिणीसाठी संवाद आणि शेतकरी मेळाव्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे नेते असलेल्या पवार यांच्या दौऱ्यात भुजबळांनी दांडी मारल्याची राजकीय चर्चा रगलिये. भुजबळ आपला मतदारसंघ असलेल्या येवल्यात आहेत . अजित पवारांनी मात्र कार्यक्रम पूर्वनियोजित होता असे सांगत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 


विरोधकांना सुनावले 


वेषांतराच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेयत...नाव बदलून कधीही प्रवास केलेला नाही.लपून छपून मी प्रवास करत नाही, उथळमाथ्यानं प्रवास करतो.नाव बदलून प्रवास केला हे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन.नाहीतर आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणा-यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असं आव्हान अजित पवारांनी दिलंय...संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी अजितदादांवर आरोप केले होते...त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.