नाशिक : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिल्यानंतर भाजपनं आता नाशिकमध्ये शिवसेनेला दणका दिला आहे. नाशिकमधली विधान परिषद निवडणूक ही आता तिरंगी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि भाजपकडून अपक्ष परवेज कोकणी हे मैदानात उतरल्याची चर्चा आहे. सुरुवातीला विधान परिषदेच्या निवडणुकींसाठी भाजप आणि शिवसेनेनं समसमान जागांवर उमेदवार दिले होते. पण कोकणी हे मैदानात उतरल्यामुळे भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एकाचवेळी शह देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. तर विधान परिषद निवडणुकीतून ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह दोघांनी अर्ज मागे घेतले आहेत. परवेज कोकणी यांच्यामुळे आता घोडेबाजार रंगणार असून स्थानिक स्वराज्य संस्थानांतील उमेदवारांना मत देण्यासाठी बोली लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING