Nashik Bribe Case : नाशिक महापालिकच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या झडतीत मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले. सुनीता धनगर या 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तर पालिकेतील लिपिक नितीन जोशी हे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांना अटक झाली असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी  सुनीता धनगर यांच्या घरावर छापा मारला. यावेळी छाप्यात 85 लाख रुपये कॅश  आणि 32 तोळे सोने आढळले. तसेच काही मालमत्तांची कागद पत्रे देखील सापडली आहेत. सुनिता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.


आडगाव येथे प्लॉट असून एक फ्लॅट टिळकवाडी आणि दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे आहे.  राहत्या फ्लॅट 3bhk  असून त्याची किंमत दीड कोटीच्या घरात आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिली. सुनीता धनगर आणि मनपा कर्मचारी नितीन जोशी यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.



लाच प्रकरणाबाबत  Acb तक्रार करण्यात आली होती. 50 वर्षीय तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामी त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील संबंधिताला संस्था तक्रारदारास सेवेमध्ये दाखल करुन घेत नसल्याने त्यांनी याबाबत मनपा शिक्षण अधिकारी धनगर यांच्याकडे या संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी धनगर यांनी याबाबत पत्र देण्याच्या बदल्यात 50 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. लिपिक जोशी याने हे पत्र बनवण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली, असी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.