नाशिक महापालिका पूर्णपणे ई पोर्टलवर येणार
नाशिक महापालिका, त्यातले अधिकारी, कर्मचारी आणि नाशिककर जनताही या सर्वांना शिस्त लावण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विडा उचललाय. नाशिक महापालिका आणि पूर्णपणे ई पोर्टलवर येणार आहे.
नाशिक : नाशिक महापालिका, त्यातले अधिकारी, कर्मचारी आणि नाशिककर जनताही या सर्वांना शिस्त लावण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विडा उचललाय. नाशिक महापालिका आणि पूर्णपणे ई पोर्टलवर येणार आहे.
तक्रारी आणि मागण्या नोंदवता येणार
नागरिकांना या पोर्टलवर आपल्या तक्रारी आणि मागण्या नोंदवता येणार आहेत. त्या सात दिवसात सोडवणं सक्तीचं असणार आहे. काम न झाल्यास विभागीय अधिकारी आणि विभागप्रमुख अधिकाऱ्यांना स्वयंचलीत कारणे दाखवा नोटीस जाणार आहे.
कामाच्या सेवेचं रँकींग देऊन अभिप्राय द्या
नागरिकांनाही या कामाच्या सेवेचं रँकींग देऊन अभिप्राय देणं सक्तीचे असणार आहे. म्हणजेच या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता नागरिकांनी ठरवायची आहे. नाशिककरांना कचरा घेऊन येणाऱ्या घंटागाडीचा मेसेज दहा मिनिटे आधी मिळेल. त्यामुळे नागरिकांना कचरा घेऊन तयार राहता येईल. घंटागाडी आली नाही तर ऑनलाईन तक्रार करता येईल.