नाशिक हादरलं! झोपेतच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःलाही संपवलं
Nashik Crime : नाशिकमध्ये झोपेतच पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीन स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Crime News : नाशिकमध्ये (Nashik Crime) हत्येचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकच्या आडगावमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या करुन स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. झोपेत असतानाच पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nashik Police) घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छामनी नगर परिसरात ही हादरवणारी घटना घडली आहे. विशाल निवृत्ती घोरपडे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर प्रिती विशाल घोरपडे असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. पत्नी झोपेत असताना विशाल निवृत्ती घोरपडे याने मुसळी डोक्यात टाकत तिची हत्या केली आहे. त्यानंतर विशाल घोरपडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र पत्नीच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भाच्याने केली मामाची हत्या... दिंडोरीच्या खेडले गावातील धक्कादायक घटना
किरकोळ भांडणातून भाच्याने मित्राच्या मदतीने मामाची हत्या करून मृतदेहावर पेट्रोल पेटवून देत टाकून पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या दिडोंरी तालुक्यातील खेडले गावात घडला आहे. संदिप मेधने असे मृत मामाचे नाव आहे. संशयित आरोपी भाचा किरण कदम मित्रांसह मृत मामा मेधने यांच्या घरी गेला होता. त्यानंतर किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या भाच्याने मामाला घराबाहेर नेत मित्राच्या संगनमताने डोक्यात दगड घालून तसेच धारदार हत्याराने करून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी घराजवळील चिंचेच्या झाडाखाली मयत मामाच्या शरीरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह अर्धवट जळाल्याने स्थानिकांना या प्रकाराची माहिती मिळाली. याप्रकरणी वणी पोलिसांनी भाचा किरण कदमसह त्यांच्या मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मालमत्तेच्या कारणावरून हे हत्याकांड घडल्याचे बोललं जात आहे.