COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : राज्यात सर्वाधिक पगार नाशिक महापालिकेत मिळतो. शिपायाचा पगार शासकीय वरिष्ठ क्लार्कप्रमाणे तर उपायुक्तांचा पगार उपजिल्हाधिकाऱ्यांइतका असल्याचा दावा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलाय. पालिकेतील वरिष्ठ लिपिक ३२ हजाराहून अधिक पगार घेतो.. त्याचं स्केल ९ हजार ३०० ते ३४ हजार ८०० इतकं आहे. त्याचं ग्रेड वेतन ४२०० इतकं आहे. दुसरीकडे शासनाच्या शासनाच्या लिपिकाचं स्केल ५ हजार २०० ते २० हजार २०० असून ग्रेड वेतन २ हजार ४०० इतके आहे.


३६ टक्के खर्च वेतनावर 


शासनाच्या लिपिकाला१८ हजार १६४ पगार मिळतो तर पालिकेच्या लिपिकाला चक्क ३२ हजार २६५ रुपये इतका पगार मिळतो. शिवाय हजार रुपये दर महिन्याला वैद्यकीय भत्ता, किरकोळ आजारासाठी २५ हजार तर कुटुंबातील सदस्यांच्या आजारासाठी ५० हजार मदतही मिळते.. हा पगार सातव्या वेतन आयोगापेक्षा अधिक असून यामुळे एकूण उत्पन्नाच्या ३६ टक्के खर्च सध्या वेतनावर होत असल्याचा दावा आयुक्तांनी केलाय.