योगेश खरे झी 24 तास नाशिक : शहरातील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक घटनेनं नाशिक शहर हादरून गेलंय. इथं एका डॉक्टरचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. स्वप्नील शिंदे असं या डॉक्टरचं नाव आहे. त्याच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बीडमधील स्वप्नील शिंदे शिक्षणासाठी पवार मेडिकल कॉलेजमध्ये आला होता. मात्र सिनिअरच्या त्रासाला तो बळी ठरला असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. (nashik doctor student swapnil shinde suicide due to likely be raging)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कॉलेज प्रशासनानं मात्र रॅगिंगचे आरोप फेटाळून लावलेत. स्वप्नीलची मानसिक अवस्था ठीक नव्हती. त्याच्यावर वर्षभरापासून उपचार सुरू होते असं कॉलेज प्रशासनाचं म्हणणं आहे. स्वप्नीलच्या संशयास्पद मृत्यूनं पोलिसही चक्रावलेत. रॅगिंगनेच स्वप्नीलचा बळी घेतला का? घातपातामुळेच त्याला जीव गमवावा लागला का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्य़ाचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.