योगेश खरे / नाशिक : Nashik :जिल्ह्यातील बनावट स्टॅम्प घोटाळा ( Fake stamp paper scam) देवळा प्रकरणातील मुख्य तेलगी चंद्रकांत तथा गोटू वाघ याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. (Stamp seller Gotu Wagh arrested ) 'झी 24 तास'ने या प्रकरणाचा सातत्याने केला होता पाठपुरावा केला होता. देवळापोलिसांनी पहाटेच्या सुमारास त्याला अटक केली. गेले अनेक दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. भास्कर निकम या शेतकऱ्यांची जमीन त्याने परस्पर बापू वाघ यांच्या नावावर केली होती. या प्रकरणांमध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक बापू वाघ या दोघांना अटक करण्यात आली आह. याच पद्धतीची प्रकरण नाशिक मालेगावमध्ये सुद्धा उघड झाल्याने निबंधक विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आता नाशिकमध्येही निबंध विभागातील सुनील पवार अद्याप फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवळा तालुक्यातील भास्कर निकम यांची मेशी शिवारातील वडिलोपार्जित शेती आता त्यांच्या नावावर होणार आहे. बनावट मुद्रांकाच्या माध्यमातून शेतजमीन लाटल्याप्रकरणी खोट्या दस्ताद्वारे झालेल्या शेतजमीन खरेदीची नोंद रद्द करण्याचे आदेश चांदवड उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिले. या जमिनिवर पुन्हा मूळमालकाचे नाव लावण्यात यावे, याबाबतचा सातबारा तात्काळ देण्यात यावा अशा सूचना या करण्यात आल्या आहेत.


भास्कर निकम यांची वडिलोपार्जित जमीन या मिळकतीची विक्री झालेली नसतांना 2012 मध्येच जमिनीची विक्री झाल्याचे तलाठी कार्यालयात झालेल्या नोंदीवरून दिसून आले. या खरेदी खताचा जो दस्तक्रमांक नमूद करण्यात आला आहे. लोहणेर येथील एका महिला शेतकर्‍याने खरेदी केलेल्या भूखंडाच्या दस्ताचा असल्याचे उघड झाले होते. या प्रकारामध्ये देवळा उपनिबंधक कार्यालयात काम करणारा चंद्रकांत वाघ याने परस्पर दस्तऐवजात खाडाखोड करून दुसऱ्याच्या नावे केली होती. मात्र आता भास्कर निकम यांना ही जमीन परत मिळणार आहे. तर या प्रकरणी आरोपी स्टॅम्प वेंडर चंद्रकांत वाघ अद्याप फरार आहे


नाशिक जिल्ह्यात बनावट मुद्रांक तयार करून अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झालाय देवळातून सुरू झालेला हा घोटाळा आता नाशिक मालेगाव तालुक्यांमध्ये आढळून आल्याने दिवसेंदिवस गुन्हे दाखल होण्याची संख्या वाढतेय. या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याने मुद्रांक महानिरीक्षक हादरले आहेत. जिल्ह्यातील वारस हक्कांची नोंद करून हरकत घेणार यांचा शोध निबंधक विभाग करत आहे. गेल्या चोवीस तासात मालेगावात तीन गुन्हे दाखल झाल्याने राज्यभर निबंधक कार्यालयांमध्ये तेलगी वावरत असल्याची 'झी24तास'ची बातमी खरी ठरली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यामध्ये जमीन हडपणाऱ्यांची शोध मोहीम सुरू केली आहे.