नाशिक : नाशिक शहरात अलीकडे महिला चोरी करण्यासाठी सक्रिय होतांना दिसून येत आहे. मात्र यात लहान मुलींच्या सहाय्याने चोरी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला आहे. हा सर्व प्रकार पाहून तुम्हीही चक्रावून जाल. कशाप्रकारे या महिला सराफाच्या दुकानातून चोरी करतात. तुम्ही जी दृश्य पाहिली. ती आहेत नाशिकच्या एका सराफी दुकानातली. हल्ली नाशिकच्या सराफी दुकानामध्ये महिला चोरांचा असाच सुळसुळाट झालाय. नाशिकरोडच्या बाफना ज्वेलर्समध्ये गेल्याच आठवड्यात ही घटना घडली. दोन महिला एका मुलीला घेऊन दुकानात आल्या. बांगड्या बघण्याच्या प्रयत्नात ६० ते ७० सेट पाहिले आणि त्यातलाच एक सेट लांबवला तोही लहान मुलीच्या मदतीनं....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अगदी अशाच चौऱ्या आणखी चार दुकानांमध्ये झाल्यात. पण चारही चोऱ्या वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत आहेत. सीसीटीव्हीची सुविधा प्रत्येक दुकानात असेलच असं नाही. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे.