Nashik Gavathi Kothimbir Price: गेल्यावर्षी टोमॅटोने रडवल्यानंतर आता कोथिंबीरने सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करायला सुरुवात केली आहे. कोथिंबीरचे दर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग असलेली कोथिंबीर आता गृहिणींना परवडेनाशी झाली आहे. पालेभाज्याशी उत्पादन कमी होत असल्याने आवक घटली आहे. नाशिक बाजार समितीत 8 सप्टेंबर रोजी लिलाव पार पडला. काल पार पडलेल्या या लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति शेकडा भाव मिळालाय.


स्थानिक विक्रीसाठी खरेदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून. पालेभाज्या आणि फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबाद कडे पाठविला जातो. आणि काही प्रमाणात हा स्थानिक विक्री साठी व्यापारी खरेदी करत असतात.


जुडीचे दर 


पालेभाज्या आवक सद्यःस्थितीत घटली आहे. यामुळे बाजारभाव वधारले आहेत . बाजार समितीत रविवार रोजी झालेल्या लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीर किमान ,65रुपये जुडी ते सर्वाधिक 400 रुपये जूडी,चायंना कोथिंबीर किमान 40 तर सर्वाधिक 280 रुपये जूडी, मेथी किमान 50 तर सर्वाधिक 130 रुपये जूडी, शेपू किमान  22 तर सर्वाधिक 57 रुपये जूडी, कांदापात किमान  15 तर सर्वाधिक 42 रुपये जूडीला भाव मिळाला आहे. 


गृहीणींचं बजेट कोलमडलं


तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर,मेथी,शेपू, कांदापात यांची झूडी छोटी करून डबल बाजार भावाने विक्री होत आहेत.भाजीपाल्याचे भाव प्रचंड वाढल्याने मात्र गृहिणीच्या घरातील किचनचे बजेट कोलमडले आहे.