Nashik Satyajeet Tambe  : नाशिक पदवीधर मतदार संघातून ( Nashik Graduate Constituency Election ) काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. (Maharashtra Political News) मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुलासाठी वडिलांनी माघार घेतली आहे.


अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली गेली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे काही क्षण उरले असतानाही भाजपचा नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली गेली आहे. तर काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला होता. त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे नाशिकच्या महसूल कार्यालयात अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी वडील सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत मुलाला संधी दिलीआहे. भाजप कोअर कमिटी पदाधिकारीही विभागीय कार्यालयात AB फॉर्म घेऊन दाखल झालेत. मात्र भाजप AB फॉर्म कोणाला याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. (अधिक वाचा - Congress : नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसकडून आधी यांना उमेदवारी जाहीर)


भाजपकडून चमत्कार होऊ शकतो असे वक्तव्य, मात्र, काँग्रेसकडून दे धक्का


नाशिक पदवीधर निवडणूक प्रक्रियेत चमत्कार होऊ शकतो, असं मोठं वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले होते. सत्यजित तांबे यांनी भाजपची उमेदवारी केली तर स्वागतच आहे, असं विधानही विखे पाटील यांनी केले होते. भाजपचा उमेदवार कोण यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांच्या नावाचीही उमेदवारीसाठी चर्चा आहे. मात्र राजेंद्र विखेंच्या उमेदवारीबाबत कल्पना नसल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.


काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यांनी एबी फॉम दिला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. दरम्यान, सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमदेवारी जाहीर करण्यावर पेच निर्माण झाला होता. तसेच भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. काँग्रेसला दे धक्का देण्यासाठी भाजपने तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने जोरदार सूत्र हलवित तांबे यांच्या घरात उमेदवारी राहिल याची काळजी घेतली. 


सत्यजित तांबे भाजपमध्ये जाण्याची चर्चा आणि...


सत्यजित तांबे नाराज होते. ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तांबे कुटुंबाच्या संपर्कात होते. नाशिकचा विधानपरिषद उमेदवार ठरवण्याची मुभा तांबे कुटुंबाला देण्यात आली होती. सत्यजित तांबे हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने तातडीने पावलं उचलल्याचं दिसतंय. स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तांबे कुटुंबाशी चर्चा केली. काँग्रेसच्यावतीने अर्ज कोणी भरावा, सुधीर तांबे की मुलगा सत्यजित तांबेंनी भरावा याची मुभा खरगे यांनी तांबे कुटुंबालाच दिली होती. त्यानुसार अखेरच्या क्षणी वडिलांनी माघार घेत मुलाला संधी दिली आहे.