नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालकांचा उपचारा अभावी झालेल्या मृत्यूचं प्रकरण ताज असतानाच आता सेवा हिस्टो पॅथोलॉजी लॅबमधील अनास्थाही समोर आलीय. कॅन्सर रुग्णांच्या ट्युमरचे नमुने ठेवणारी राज्यभरतील सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या नाशिकच्या या रुग्णालयात रुग्णांच्या ट्युमरचे नमूने चक्क चॉकलेट-गोळ्या ठेवण्यात येणा-या बरण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन ते चार लोखंडी रॅकमध्ये जवळपास तीन हजार कॅन्सर रुग्णांचे नमुने ठेवण्यात आले असून यावर बाहेरील वातावरणाच परिणाम होत असून रोगाचं निदान योग्यपद्धतनं करण्यात त्रुटी निर्माण होऊ शकतात.


याबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना प्रश्न विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण टाळलं. तर लॅबमधील संबंधित अधिका-यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी गोळ्या-बिस्किटांच्या रिकाम्या बरण्या ठेवल्याचं उत्तर दिलं.