नाशिक  :  आरामदायी विमानप्रवास सार्‍यांना मिळावा याकरिता सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता लवकरच नाशिक मुंबई आणि नाशिक पुणे विमानसेवा सुरू होणार आहे.  मात्र त्याचा मुहुर्त दुसर्‍यांदा टळला आहे. 


पुन्हा एकदा पुढे ढकलली तारीख  


 नाशिक विमानसेवेची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आहे. 23 डिसेंबरला नाशिक विमानसेवा सुरु होणार होती. ही सेवा आता 31 डिसेंबरला सुरु होणार आहे. त्यामुळे विमानसेवेसाठी पुन्हा आठवडाभर नाशिककरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


  
  केवळ विमानसेवा उद्घाटनाचा सोपस्कार पूर्ण करणार 
  


केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत २३ डिसेंबरपासून, नाशिक - मुंबई आणि नाशिक - पुणे विमानसेवा सुरु होणार होती. त्याऐवजी २३ डिसेंबरला केवळ हिरवा झेंडा दाखवून या विमानसेवा उद्घाटनाचा सोपस्कार पूर्ण केला जाणार आहे. त्यासठी एअर डेक्कन केवळ एक विमान राजकीय नेत्यांसाठी आणून हा कार्यक्रम उरकणार आहे.