तुकाराम मुंढेंच्या प्रश्नावर तरुण इंजिनिअर निरुत्तर, मग पुढे असं झालं!
एका तरुण इंजिनिअरला आज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं कठीण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल
नाशिक : पालिकेतील एका तरुण इंजिनिअरला आज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं कठीण झाल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला. वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाच्या वेळी एका तरुण बांधकाम अभियंत्याला मुंढेंनी रस्त्यावर मुरुम कधी टाकतात, हे माहिती आहे का, असा प्रश्न विचारला. प्रश्नांच्या भडीमारानं तरुण मुलगा निरुत्तर झाला. वॉ़क विथ कमिशनर कार्यक्रमात मग आयुक्तांनी सर्वांनाच अभियांत्रिकेचे धडे दिले.
रस्त्यावर कधी माहिती टाकतात, हेच नवीन अभियंत्यांना माहित नसल्याची पुढे आले. वॉक विथ कमिशनर कार्यक्रमात युवा सिव्हिल इंजिनिअरला मुंढे यांनी चांगलेच झापले. यावेळी युवा सिव्हिल इंजिनिअर निशब्द झाला. दरम्यान, रस्ता खराब असतांना फक्त मुरूमच टाकलानंतर काहीच केले नाही, असा प्रश्न युवा सिव्हिल इंजिनिअरने विचारला होता. त्यानंतर सर्व प्रकार पुढे आला.
तुकाराम मुंढे यांची झाडाझडती
-रस्त्यावर मुरुम कधी टाकता माहिती आहे का ?
- सिव्हिल इंजिनिअरचे बेसिक प्रिन्सिपल सांग ?
- यावेळी युवा सिव्हिल इंजिनिअर निशब्द
- प्रश्नांचा भडीमार करत आयुक्तांनी दिले वॉक विथ कमिशनर कार्यक्रमात इंजिनिअरिंगचे धडे
- रस्ता खराब असतांना फक्त मुरूमच टाकला नंतर काहीच केले नाही असा प्रश्न युवा सिव्हिल इंजिनिअरने विचारला होता.