COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेत. 'कामाला त्रासून जग सोडून जात आहे' असे चिठ्ठीत लिहून बेपत्ता झालेले महापालिकेचा सहा. अभियंता रवी पाटील अद्याप सापडलेले नाहीत. तसेच अतिक्रमण मोहीम अद्याप थांबलेली नसल्याने नाशिक शहरात अस्वस्थता वाढली आहे. कामगार संघटना, नागरिक, अधिकारी आणि  भाजपाचे आमदार पदाधिकारी आता त्याच्या विरोधात सक्रीय झाले आहेत.


नाशिक महापालिकेत आकृतीबंधात अपूर्ण मनुष्यबळात काम करावे लागतेय. काम करूनही निलंबन, बडतर्फच्या कारवाईंची टांगती तलवार डोक्यावर असल्याने महापलिकेत मुंढे यांच्या पंधरा दिवसाच्या सुटीने किमान सुटका झाल्याची प्रतिक्रिया येत आहे.


या दरम्यान आता कामगार संघटना आंदोलांच्या तयारीत असून सामुहिक राजीनामे देण्याची तयारी चालविली आहे त्यामुळे येत्या काळात महापलिका मुंढे विरोधात दणाणणार अशी चिन्हे आहेत.