नाशिक पालिका कर्मचाऱ्याचा स्वाईन फ्लूने मृत्यू
महापालिका कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. ज्यांच्यावर स्वाईन फ्लू रोखण्याची जबाबदारी आहे, त्याच महापालिकेच्याच कर्मचाऱ्याला स्वाईन फ्लू झाल्यामुळे खळबळ उडालीय.
नाशिक : महापालिका कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. ज्यांच्यावर स्वाईन फ्लू रोखण्याची जबाबदारी आहे, त्याच महापालिकेच्याच कर्मचाऱ्याला स्वाईन फ्लू झाल्यामुळे खळबळ उडालीय.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढतेय. स्वाईन फ्लू रोखण्यात महापालिका आणि आरोग्य यंत्रणेला अपयश आलंय. गेल्या ९ महिन्यात स्वाईन फ्लूनं ४७ रुग्ण दगावलेत.
जिल्हा रुग्णालयात एप्रिल महिन्यापासून इंफ्लूएन्जा लस उपलब्ध नाही. स्वाईन फ्लू विभागात काम करणारे कर्मचारी आणि स्वाईन फ्लू संशयित गरोदर माता यांना प्रामुख्याने ही लस दिली जाते.