सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक: हल्ली सगळीकडेच गुन्हेगारी (Crime News) वृत्त वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिक (Citizens) अधिक सतर्क होत आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. सध्या माथेफिरू (Psycho) लोकांचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या आफताब आणि श्रद्धाच्या प्रकरणानं (Sharddha Walker Case) असा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. सध्या नागरिकांना कोणावर विश्वास ठेवणंही यामुळेच कठीण झालं आहे. नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीकडे वाईट नजरेने बघत जाऊ नको असे सांगण्याचा राग मनात धरत एकाने घरात घुसून पत्नीची (Wife Saree) साडी ओढली तर पतीवर कोयत्याने वार केले आहेत. या घटनेत पती गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत आहे आणि त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारचा (Sunday) हा प्रकार असून पतीने मंगळवारी याबाबत नाशिकरोड पोलिसांकडे जबाब नोंदवताच गणेश राऊत या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महिनाभरात दोन वेळा त्याने बायकोची छेड काढल्याची माहिती पतीने दिलीय. पतीनं पत्नीचं संरक्षण करायचं (Security) असतं ही बाब खरी असली तरी सध्या महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या अशा घटना वारंवार पाहायला (Social News) मिळत आहेत त्यामुळे समाजात सध्या संतापाचं वातावरण पसरलं आहे. 


जखमी पतीनं काय म्हटलं पाहा  


घडल्या प्रकारामुळे पत्नीच्या पतीला जबर जखम झाली आहे, त्यामुळे त्याला तातडीनं रूग्णालयात (Private Hospital) भरती करण्यात आलं आहे. घडल्या प्रकाराबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मी आणि माझी पत्नी घरी होतो तेव्हा घरात कोणीच नव्हते आणि तो असाच आजूबाजूला वावरत होता. असाच वावरत असता आम्ही पाहिलं आणि कशाचीही काहीही कल्पना नसताना तो अचानक घरात शिरला आणि माझ्या पत्नीची साडी ओढली आणि माझ्यावर कोयत्यानं वार केले आणि माझ्या हातावर गंभीर जखम झाली. 


माझ्या पत्नीची साडी ओढली अन्...


मी दुसऱ्या खोलीत असाच झोपलो होतो आणि तेव्हाच त्यानं माझ्या पत्नीची साडी ओढली. आणि त्यानं मला पाहून कोत्यानं फार केले. या माणसाची आणि माझी किंवा माझ्या पत्नीशी काहीही ओळख नव्हती. त्यातून मागच्या महिन्यात या माणसानं माझ्या पत्नीला काही हातवारे (Attack) आणि इशारे केले होते त्यामुळे आम्ही त्याला चांगलीच समज दिली होती. हा प्रकार घडण्याच्या अगोदरही आम्ही त्याला दोनदा भेटून समज दिली होती यावेळी मात्र आम्ही त्याला चांगलीच समज दिल्यामुळे तो शांत झाला होता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा (Man) तो तसंच वागायला लागला, असं जखमी पतीनं सांगितलं आहे.