Nashik Crime News: नाशिकमधून वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कोणतीही पदवी किंवा शैक्षणिक पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका डॉक्टर दाम्पत्य अवैधपद्धतीने हा सर्व कारभार करत असल्याचे समोर आले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर दाम्पत्याने कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करुन एका तरुणाचे नाक खराब केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या डॉक्टरकडे त्वचारोग किंवा प्लास्टिक सर्जरीचे उपचार करण्यासाठीची कोणतीही पात्रता नसतानाही त्यांनी उपचार केले, असा दावा या रुग्णाने केला आहे. या प्रकरणी रुग्णाने डॉक्टर जयदीप घोषाल आणि सुजाला घोषाल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी या तरुणाला तब्बल तीन वर्षे लढा द्यावा लागला. महानगरपालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोघांनी उपचारात निष्काळाजी व हलगर्जीपणा झाल्याचा अहवाल दिल्याने हा गुन्हा दाखल होऊ शकला, असंही त्याने म्हटलं आहे.


सुजित (रुग्णाचे नाव बदलले आहे) असं रुग्णाचं नाव आहे. सुजितने 2020 साली मुरमांमुळे त्रस्त होऊन डॉक्टर घोषाल यांच्याकडे ट्रीटमेंटची सुरुवात केली होती. सुरुवातीला जयदीप घोषाल यांनी आपली पत्नी अमेरिकेतून शिकून आल्याचा सांगितलं. मात्र ट्रीटमेंट ही जयदीप घोषाल यांनी केली. मात्र तीन वर्षात 90 पेक्षा अधिक ट्रीटमेंट करूनही नाकावरील स्किन ही पूर्णपणे डॅमेज केली. यादरम्यान काही सर्जरी सुद्धा केल्या. रुग्णाची परवानगी न घेता नाजूक शस्त्रक्रिया करून नाकाचा भाग खराब केल्याने चेहरा विद्रूप झाला, असा आरोप रुग्णाने केला आहे. नगरपालिका आणि जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानंतर आता नाशिकच्या सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये घोषाल दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे


रुग्णाच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांची अधिक चौकशी केल्यानंतर घोषाल यांच्याकडे एमबीबीएस डॉक्टरची पदवी होती. त्यांनी त्वचारोग व प्लास्टिक सर्जरीची कोणतीही डिग्री नसताना त्यांनी उपचार केले आहे. यानंतर गुजर यांनी यासंदर्भात आरोग्य विभाग आणि महापालिकेकडे वारंवार तक्रार केली. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. डॉ. घोषाल दाम्पत्यांविरोधात सरकार वाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गुजर यांनी सरकार वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक म्हणजे या डॉक्टरविरोधात या पूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, डॉ दाम्पत्यानं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.  नुकसान भरपाईच्या नावाने लाखो रुपये उकळण्यासाठी तो आरोप करत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.