Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) येत्या काळात अनेक विकासकामं, प्रकल्पांच्या उदघाटन आणि लोकार्पण सोहळ्याना हजेरी लावताना दिसणार आहेत. अशाच पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान 12 जानेवारी 2024 रोजी नाशिकमध्ये येणार असून, त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्रशासनानं दिलेल्या या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील वाहतूक मार्गांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळं शहरातील नागरिकांना बदललेल्या मार्गांनी प्रवास करावा लागणार असून या प्रवासासाठी त्यांना जास्तीचा वेळही लागण्याची शक्यता आहे. अधिकृत माहिती आणि सूचनांनुसार शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून सभा संपेपर्यंत वाहतूक बदलांचे हे नियम लागू असणार आहेत. 


वाहतूक मार्गांमध्ये बदल 


  • अमृतधाम, रासबिहारी मार्गे ये-जा सुरु राहणार

  • द्वारका उड्डाणपुलावरून जाणारा दोन्ही बाजूंचा रस्ता सुरु

  • नाशिकरोडकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने फेम सिग्नल, डीजीपीनगर, वडाळागाव, कलानगर, पाथर्डी फाट्यावरून मुंबईकडे

  • नांदूरनाका ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक बिटको, नाशिकरोड, जेलरोड, जत्रा चौफुलीमार्गे वळवण्यात येईल

  • दिंडोरी, पेठरोडकडून येणरी वाहने पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, रामवाडी पुलमार्गे वळवण्यात येणार आहे


 


कोणकोणत्या मार्गांवरील वाहतूक बंद? 


  • काळाराम मंदिर ते नाग चौक, काट्या मारुती चौकीकडे जाणारा मार्ग

  • सरदार चौक ते काळाराम मंदिरकडे दोन्ही बाजूंचा मार्ग (ये-जा करणार रस्ता) मार्ग

  • मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड, गाडगे महाराज पुलापर्यंत दोन्ही बाजूंचा मार्ग मार्ग

  • तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा मार्ग

  •  दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा मार्ग

  • टाकळी गाव, काठे चौकाकडून सिदधीविनायक चौक, अमृतधामकडे जाणारा मार्ग

  • सितागुंफा मंदिर ते काळाराम मंदिराकडे जाणारा मार्ग

  • लक्ष्मी नारायण मंदिर ते तपोवन दिशेनं जाणारा मार्ग

  • निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवनच्या दिशेनं जाणारा मार्ग


हेसुद्धा वाचा : 'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर 


  • बिडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग

  • नांदूरनाका ते तपोवनकडे येणारा मार्ग

  • रासबिहारी ते निलगिरी बागकडे येणारा मार्ग

  •  स्वामी नारायण चौक ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग

  • काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉईंटकडे जाणारा मार्ग

  • अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग

  • जनार्दन स्वामी मठ टी पॉईंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग

  • संतोष टी पॉईंट ते स्वामी नारायण चौकीकडे जाणारा मार्ग

  • तपोवन चौफुली ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग