मृत्यूच्या दाढेतून खेचून आणंल! विदर्भ एक्स्प्रेसच्या चाकाखाली डोकं जाणार इतक्यातचं...VIDEO समोर
Nashik Vidarbha Express: चालत्या ट्रेनमधून चढू अथवा उतरु नका. पण बहुतांशजण याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकांना याचा भुर्दंड सहन करावा लागतो.
Nashik Vidarbha Express: तुम्ही लोकल किंवा एक्स्प्रेसने प्रवास करत असाल तेव्हा स्थानकावर एक उद्घोषणा तुम्हावा वारंवार ऐकू येते. चालत्या ट्रेनमधून चढू अथवा उतरु नका. पण बहुतांशजण याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. तर काहीजणांचा रेल्वेतून उतरताना तोल जातो. त्यामुळे अनेकांना याचा भुर्दंड सहन करावा लागतो. असाच एक प्रकार नाशिक रेल्वे स्थानकावर घडलाय. नाशिक स्थानकावर उतरणाऱ्या एका महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडली. नशिब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.
सुरक्षा रक्षकांनी दाखवली सतर्कता
मुंबईच्या दिशेने येणारी विदर्भ एक्स्प्रेस नाशिक स्थानकावर लागत होती. एक्स्प्रेसचा वेग हळुहळू कमी होत होता. स्थानकावर उद्घोषणा सुरु होती. नाशिक स्थानकावर उतरु इच्छिणाऱ्या महिलेचा अचानक तोल गेला. तिला स्थानकावर स्थिर उभ राहणं जमलं नाही. तिचा तोल गेला आणि ती फरफटत चालली होती. अशावेळी काहीही घडू शकलं असतं. पण ही घटना जवळच असलेल्या रेल्वे सुरक्षा रक्षकांने पाहिली. त्यानी महिलेच्या दिशेने वाघासारखी झेप घेतली. महिलेचं डोकं ट्रेनखाली जाणारच होतं इतक्यात त्याने तिला मागे खेचलं. सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले.
पाहा व्हिडीओ
सीसीटीव्हीमध्ये धावत्या रेल्वेतून उतरणारी महिला
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या महिलेचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये धावत्या रेल्वेतून उतरणारी महिला दिसत आहे. ट्रेनच्या वेगासोबत ती फरफटत पुढे येतेय पण रेल्वे सुरक्षा रक्षक आणि इतर प्रवाशांनी तिच्या दिशेने धाव घेतली आणि तिचे प्राण वाचवले.
दोन्ही सुरक्षा रक्षकांचे कौतुक
महिलेचा तोल गेल्यानं ती रेल्वेखाली जाणार होती. पण नाशिक रेल्वे स्थानकातील सुरक्षारक्षकाने तिला वेळीच बाहेर ओढले. पूजा गोसावी असं या महिलेचे नाव असून ती आता सुखरूप आहेय पूजा ही मनमाड येथील हनुमान नगर येथे राहणारी आहे. रेल्वे पोलीस असलेले योगेश गव्हाड आणि खंडू गोलवड यांनी महिलेचे प्राण वाचविले आहेत. या घटनेनंतर दोन्ही सुरक्षा रक्षकांचे कौतुक केले जात आहे. तसेच रेल्वेच्या उद्घोषणा गांभीर्याने घ्या. त्याकडे दुर्लक्ष करु नका, असे आवाहन करण्यात आले आहे.