शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसटला, कांद्याच्या दरात `इतक्या` रुपयांनी घसरण
Nashik Onion Price Fall: शेतकऱ्यांच्या डोळ्यात नेहमी वेगवेगळ्या कारणाने पाणी आणणारा कांदा यंदाही रडवतो की काय? अशी परिस्थिती दिसून येत आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्यान शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Nashik Onion Price Fall in Marathi : कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीठ एका पाठोपाठ एक संकट शेतकऱ्यांचा पाठलाग सोडायचं नाव घेत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला असतात त्यातच आता कांद्याचा भाव घसरणीचा सामाना करावा लागत आहे. लालसगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील 24 तासाच कांद्याच्या दरात 150 रुपयांची घसरण झाली आहे. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यातच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याचे जाहीर केले असले तरी 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी पर्यंतचे यापूर्वी दिलेले आदेश कायम असल्याचं केंद्र सरकारच्या उच्चाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलये.
कांदा निर्यातीवर बंदी
कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय लागू केला आहे. यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून कांद्यावरील निर्यातबंदी उटवल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी पर्यंतचे यापूर्वी दिलेले आदेश कायम असल्याचं केंद्र सरकारच्या उच्चाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलये. याचदरम्यान वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी गृहमंत्र्याच्या निर्यातीत काही प्रमाणात शिथिलता देण्याच्या आदेशाला केराची टोपी दाखवली आहे .द्विपक्षीय कारणासाठी पाच देशांना कांदा पाठवला जाणार आहे. यामध्ये श्रीलंका नेपाळ भूतान मॉरिशस आणि बहरीन येथे कांदा पाठवण्याची परवानगी असल्याची माहिती मिळत आहे. दुपारच्या या स्पष्टीकरण नंतर कांद्याचे भाव आज नाशिक मध्ये पुन्हा घसरण्याची शक्यता आहे.
500रुपये प्रति क्विंटल दरानं भाव कोसळले
कांद्याचे निर्यातबंदीचे गृहमंत्र्यांचे आदेश वाणिज्य मंत्रालयाने फेटाळल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव पुन्हा घसरलेत. जवळपास 500 रुपये प्रति क्विंटल दराने भाव कमी झाले असून कांदा सरासरी बाराशे ते तेराशे रुपयांच्या दरम्यान आला आहे. आज शेतकरी कांद्याला भाव मिळेल यापेक्षा आपला कांदा काढून बाजारात आणत होता मात्र त्याचा अपेक्षाभंग झालाय. निर्यातबंदीमुळे या हंगामात अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी नाराज आहे. दरम्यान द्विपक्षीय कारणासाठी पाच देशांना कांदा पाठवला जाणार आहे. श्रीलंका, नेपाळ, भूतान, मॉरिशस, बहरीन इथे कांदा पाठवण्याची परवानगी असल्याची माहिती आहे..