कांदा उत्पादकांची `दिवाळी`
दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं बघायला मिळालं.
नाशिक : दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं बघायला मिळालं.
जिल्ह्यातील सर्वच बाजार समितिमध्ये आज उन्हाळ आणि नव्याने बाजारात आलेल्या लाल कांद्याला चांगला भाव मिळाला.
मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त ३१०० तर सरासरी २५०० रूपये दर मिळाला. सध्या नवीन लाल कांदा बाजारात विक्रीला येतोय. मनमाडमध्ये याच लाल कांद्याला जास्तीत जास्त २५०० तर सरासरी १८५० रूपयांचा दर मिळाला.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरासरी दरात अडीचशे रुपयांची वाढ झाली.