मुंबई : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचा हवाला प्रकरणात सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  जयपूर राजस्थानमधील काही व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीनं दुबईत हा पैसा रवाना होत असल्याचं समजत आहे. आयकर विभागाच्या अहवालात ही धक्कादायक बाब पुढं आली आहे. याबाबतची माहिती अंमलबजावणी संचालनालयाला कळवण्यात आली असून, आयकर विभागानं कांदा खरेदी विक्री व्यवहारावर पाळत ठेवायला सुरूवात केली आहे. 


आयटी विभागाच्या अधिका-यांनी सांगितले की अज्ञात उत्पन्नाची आणि मालमत्तांची तपासणी करताना त्यांनी या बेकायदेशीर गोष्टींवर ठपका ठेवला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सात मोठ्या नाशिक कांद्याच्या व्यापारांवर छापे टाकण्यात आले होते. 25 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम सापडली असून व्यापाऱ्यांचे जयपुरमधील लोकांशी लिंक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.