नाशिक : Hijab Controversy : मालेगावात विनापरवाना शक्तिप्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आजच्या हिजाब डेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. असे असताना आता बिबी मुस्कान हिचा सत्कार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.(Police denied permission for 'Hijab Day' in Malegaon)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगावात आज होणाऱ्या हिजाब डेला परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच काल गुरुवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हिजाब डेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 


दरम्यान, मालेगावात मुस्लिम महिलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हिजाब आणि बुरखा घालून महिलांनी मेळावा घेतला. या मेळव्यात मोठ्या संख्येनं मुस्लिम महिलांनी सहभाग घेतला होता. 



तसेच दुसरीकडे कर्नाटकातल्या हिजाबच्या (Karnataka Hijab Controversy) मुद्यावरून चर्चेत आलेल्या मुस्कान हिचा मालेगावात गौरव केला जाणार आहे. तिच्या सन्मानासाठी मालेगावातल्या उर्दू घराला मुस्कानचे नाव दिलं जाणार आहे. तसा ठराव महासभेत करणार असल्याची घोषणा महापौर ताहेरा शेख यांनी केली आहे.


हिजाब वादाप्रकरणी कर्नाटक न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. 'धार्मिक पेहराव घालून शाळा-कॉलेजात येऊ नका, असे न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भात कर्नाटक न्यायालय लवकरच अंतिम निकाल सुनावणार आहे. निकाल येईपर्यंत 'धार्मिक पेहराव घालून शाळा-कॉलेजात येऊ नका या आदेशाचं पालन करा, असे आदेश न्यायालयाने दिलेत.