नाशिकचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार निलंबित
नाशिक शहरात नागरी हक्क संरक्षण दलाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.
नाशिक : नाशिक शहरात नागरी हक्क संरक्षण दलाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
जळगाव शहरातील पोलीस अधिक्षकपदी आरोपींना मारहाण खंडणी वसूली अशा प्रकरणात वादग्रस्त ठरलेले लोहार कुटुंबिय अडकले होते. त्यानंतर त्यांना नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या हक्काविषयी तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती.
पीडितांकडून वसूली
मात्र, तेथेही या महोदयांनी पीडितांकडून वसूली सुरू केली होती याच पार्श्वभूमीवर अनेक तक्रारी दाखल केल्यानं महासंचालकांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा लोहार कुटुंबिय चर्चेत आले आहे.