नाशिक : नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या 3 अभियंत्यांना सतरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली गेलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन लाखाची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगहाथ पकडलं होतं. 


यात शाखा अभियंता अजय देशपांडे याच्यासह सहाय्यक अभियंता सचिन पाटील, कार्यकारी अभियंता देवेन्द्र पवार यांचाही समावेश आहे.


या प्रकरणी पोलीस तपास सुरु असून, या तिघांच्या चौकशीत कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता समोर येऊ शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.