सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरीच्या आश्रम शाळेतील चार मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारही मूल अनुसूयातमजा मतिमंद आश्रम शाळेतील आहेत. या शाळेत 120 विशेष मूल शिक्षण घेत आहेत. 120 मुलांपैकी चार मुलांना मंगळवारी रात्री जुलाब आणि उलटी होऊ लागल्याने त्यांना इगतपुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 


मात्र उपचारादरम्यान हर्षल गणेश भोयेर राहाणारा भिवंडी,  मोहमद जुबेर शेख (वय 8) वर्ष यांचा मृत्यू झालाय. तर आगतराव बुरुंगे (वय 17)आणि प्रथमेश बुवा (वय 15) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्ण उपचार सुरू आहेत. चारही मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.