चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : सिन्नरमधल्या मुसळगाव इथं राहणाऱ्या एका महिलेने फेटाच्या साह्याने गळा आवळून  पतीचा  खून केला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येचं कारण ऐकून पोलीसही हैराण झाले. अगदी क्षुल्लक कारणावरुन पतीचा खून करणाऱ्या या महिलेविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण?
सिन्नरमधल्या मुसळगाव इथे सीताराम गायकर हे पत्नी वनिता गायकर हिच्याबरोबर रहात होता. वनिता गायकरने पती सीतारामकडे भिशी भरण्यासाठी सहा हजार रुपयांची मागणी केली होती. पण याला सीतारामने नकार दिला. या गोष्टीचा वनिता हिच्या डोक्यात राग होता. वनिता आणि सीताराम यांच्यात वादही झाला. त्यामुळे संतापलेल्या वनिताने पती सीतारामचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.


वनिताने घरात असलेल्या फेट्याच्या सहाय्याने पती सीताराम गळा आवळला. यात सीतारामचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे यानंतर वनिताने आपल्या पतीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. 


पण पोलिसांना याबबात संशय आला, पोलीसी खाक्या दाखवताच आपणच पतीचा खून केल्याची कबुली वनिता हिने दिली. पोलिसांनी वनिता गायकरला खूनाच्या आरोपा खाली अटक केली आहे.