CM Ekanth Shinde : पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपस्थिती लावली. आजच रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्यावर राज्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झालाय. संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. रामगिरी महराजांना अटक करण्याची मागणी यावेळी मुस्लिम समाजाने केली. नाशिकच्या सिन्नरमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणइ रामगिरी महाराज एकाच मंचावर होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
रामगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचनादरम्यान पैगंबरांविषयीही वादग्रस्त वक्तव्य केलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. 'बांगलादेशात कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहेत, अनेक बांगलादेशी भारताच्या सीमेवर उभे असून भारतात आश्रय मागत आहेत. बांगलादेशमध्ये जे घडलं ते उद्या आपल्या देशात घडायला नको, हिंदूंनी सुद्ध मजबूत राहायला हवं, आपण अन्यायाला प्रतिकार करायला हवं असं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलंय.


मुस्लिम समाज आक्रमक
महंत रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनं करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. जमावाकडून रामगिरी महाराजांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रामगिरी महाराजांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. रामगिरी महाराज यांच्याविरोधात येवला आणि वैजापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मुख्यमंत्री कार्यक्रमात उपस्थित
एकिकडे रामगिरी महाराज यांच्याविरोधात राज्यात दोन ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असताना त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी महंत रामगिरी महाराजांच्या कामांचं कौतुक केलं. रामगिरी महाराजांनी अनेक कुटुंबांना दिशा दिली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.


नाशिकच्या सिन्नरमधील पंचालेन येथे हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर बघायला मिळाले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत संतांचा सन्मान केला जाईल. संतांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला भाजप नेते गिरीश महाजन, माजी खासदार सुजय विके पाटील, शिवनेचे नेत हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते.