बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार
बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थामध्ये घबराट
नाशिक : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील दुंधे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थामध्ये घबराट पसरली आहे .पहाटेच्या सुमारास शांताराम खैरनार यांच्या शेतात बांधून ठेवलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्या. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. बिबट्याने दुंधे परिसरात धुमाकुळ घालीत पशुधनावर हल्ला करून ठार केल्याच्या घटना घडल्या आहे . वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे .