नाशिक : नाशिक महापालिका आयुक्तपदाची सूत्र आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारली आहेत, पहिल्याच दिवशी तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना धक्का दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली यात, अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने गणवेश न घातल्याने या अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर पाठवलं. 


अधिकाऱ्याला बैठकीबाहेर जाण्यास सांगितले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल महाजन हे अग्निशमन दलाचे अधिकारी गणवेशाशिवाय बैठकीत बसले होते, यावर तुकाराम मुंढे यांनी त्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. हे ऐकून सर्व अधिकारी अवाक झाले.


महाजन नंतर गणवेशासह बैठकीत हजर


मात्र यानंतर काही वेळाने अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन हे गणवेशासह बैठकीत हजर झाले, यानंतर अनिल महाजन यांना पुन्हा बैठकीत तुकाराम मुंढे यांनी सामिल करून घेतले.


अधिकारी वर्ग झाला अवाक


आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी असा झटका दिल्याने अधिकारी वर्गही आता सावध भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. एकंदरीत नाशिक महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा शिस्त लागणार असल्याची चर्चा आहे.