COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातात दुचाकीवरील कुटुंबाची दोन मुलं जागीच ठार झाली आहेत. खड्डे चुकवताना दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन मुलं डंपरखाली चिरडली गेली. तर मुलांचे आईवडिल गंभीर जखमी झालेत. अपघातात या दोन्ही लहान मुलांचा जागीच मृत्यू झालाय.


गांभीर्यानं कधी पाहणार ?


मुंबई-नाशिक महामार्गावर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य याठिकाणी आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारीदेखील केल्या गेल्या पण कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.


खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याचे गंभीर प्रकार याआधीही झाले आहेत पण शासन याकडे गांभीर्याने पाहताना अद्याप दिसत नाही.