सागर गायकवाड, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Nashik Crime News: अनैतिक संबंधाच्या संशयावरून (Extra Marital Affair)  पत्नीने मुलाला हाताशी घेऊन आपल्याच पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीच्या डोक्यात मुसळी घालून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. नाशिकच्या (Nashik) पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगर मध्ये आज पहाटेच्या दरम्यान घडली आहे. दादाजी गवळी असं मयत व्यक्तीचे नाव आहे. (Wife And Son Killed Husband)


बायको-मुलाच्या मनात संशय


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीचे मेहूण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पत्नी आणि मुलाला होता. यावरुन घरात सतत भांडणं होत होती. याचाच राग दोघांच्या मनात होता. याबाबत कुटुंबीयांनी एकत्र बैठक घेऊन काही दिवसापूर्वी हा विषय बैठकीत घेतला होता. तेव्हाच बैठकीत हा विषय संपवला होता. त्यावेळी त्यांनी पुन्हा असे घडणार नाही, असे अश्वासन देत वाद मिटवला होता. तसंच, ते पत्नीला पैसे देत नसल्याने दोघांमध्ये छोट्या-मोठ्या कुरबुरी सुरुच होत्या.


ताकीद देऊनही अफेअर सुरूच


इतक्या वेळा ताकीद देऊनही आणि वाद विवाद झाल्यानंतरही प्रत्यक्षात गवळी यांनी अफेअर सुरुच ठेवले असल्याचे पत्नी आणि मुलासमोर आले. पत्नीला पुन्हा त्यांच्या अनैतिक संबंधांबाबत कळताच ती संतापली. गुन्हा घडला त्याच्या आदल्या रात्री त्यांच्यात वाद झाले होते. त्यांच्यातील भांडण टोकाला गेले होते.  त्यामुळं संतापाच्या भरात दोघांनी मिळून दादाजी गवळी यांचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आला आहे


पोलिसांनी दोघा माय-लेकांना तात्काळ ताब्यात घेतला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता गवळी व मुलगा विशाल गवळी असं अटक केलेल्या संशयितांची नाव आहेत.


कसा रचला हत्येचा कट?


दरम्यान, माहितीनुसार विशाल याने वडील दादाजी गवळी हे झोपेत असताना आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान गवळी यांचे पाय धरले आणि त्याचवेळी संधी साधून पत्नी सुनीताने त्यांच्या डोक्यात मुसळी टाकून वार केले. हा वार इतका जबर होता की झोपेतच त्यांनी जीव गमावला. पोलिसायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे.