नाशिक : मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार तुम्ही आजवर ऐकले असतील. पण नाशिकमध्ये घडलेला प्रकार फारच धक्कादायक आहे. एका महिलेने एक-दोन नव्हे तर ११ लग्न करून पुरूषांची फसवणूक करत लूट केलीयं. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या जातेगावमध्ये हा प्रकार उघङ झालायं. लक्ष्मी केरबा पात्रे असं या महिलेचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून लक्ष्मी पुरूषांशी ओळख करायची. आपण लग्नासाठी वराच्या शोधात असल्याचे सांगत संसाराची स्वप्नही रंगवायची. बिचारे पुरूष या स्वप्नांना भुलून लग्नासाठी होकार द्यायचे. हीच्या डोक्यातला खेळ मात्र ठरलेला असायचा. लग्न झाल्यावर ती १५ दिवसांत पसार व्हायची. या दरम्यान नवऱ्याची लुबाडणूक झालेली असायची.


पोलिसांची कारवाई 


 या प्रकरणी महिलेसह चौघांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी लक्ष्मीसह तिची मावशी धनला नागनाथ बिराजदार, वधूवर केंद्राचा संचालक नवनाथ चव्हाण, पूजा चव्हाण यांनाही ताब्यात घेतलंय. या टोळीने आत्तापर्यंत मुंबई, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, शिर्डी, राजस्थान, गुजरात या ठिकाणी फसवणूक केल्याचं उघड झालंय.