नाशिक : नाशिकच्या देवळाली आर्टलरी सेंटर इथल्या मैदानावर लष्कर भरती सुरू आहे. टीए पॅराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी जवळपास ३० हजारांहून अधिक तरुण दाखल झालेत. राज्यातूनच नव्हे तर आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, राजस्थान, कर्नाटकसह देशभरातून हजारो बेरोजगार तरुण नाशिकमध्ये दाखल झालेत. सोल्जर जनरल ड्युटी, हेअर ड्रेसर, हाऊस कीपिंग अशा वेगवेगळ्या ट्रेडमनच्या ६३ जागांवर भरती होतेय. आजपासून सहा दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी पहाटे चार वाजता या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. मात्र गर्दी बघून मध्यरात्रीपासून भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलीय. लष्करी अधिकारी, पोलिसांच्या उपस्थितीत ही भरती प्रक्रिया सुरु आहे. 



अनेकांनी काही तास आधीच हजेरी लावल्याने बस स्थानकावर, रेल्वे स्थानकावर आणि रस्त्याच्या कडेलाच उघड्यावरच आपला मुक्काम केलाय. यापूर्वी देखील हाडं गोठवणाऱ्या थंडीत भरती प्रक्रिया पार पडलीय. शिवाय चेंगराचेंगरी देखील झाली होती. त्यात ३ तरुण गंभीर जखमी झाले होते.