नाशिक: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या कांद्याचे भाव घसरल्याने चिंतेत आहे. कांद्याचा भाव 1 रुपये प्रति किलो झाला आहे. नाशिकमधील शेतकरी संजय साठे यांना साडे सात क्विंटल कांद्यामागे फक्त 1064 रुपये मिळाले. यामुळे संतप्त झालेल्या साठे यांनी पोस्ट ऑफिसकडे धाव घेतली आणि 'गांधीगिरी'चा मार्ग निवडत 1064 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीऑर्डर केले. मनी ऑर्डर पोहोचताच पंतप्रधान कार्यालय सक्रिय झालं आणि त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. पण शेतकरी किसान संजय साठे यांना झालेल्या नुकसानाऐवजी त्यांचे कोणाशी राजकीय संबंध आहेत का याबाबतच अधिका चौकशी झाली. ज्यामुळे संजय साठे आणि गावच्य़ा सरपंचानी नाराजी व्यक्ती केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय साठे यांची 2 एकर जमीन आहे. त्यांनी एक एकरवर कांदा तर एक एकरवर द्राक्षं लावले आहेत. यंदा कांद्याचं उत्पादन चांगलं झालं आहे. त्यांना यासाठी एकूण 75 हजार रुपये खर्च आला. चांगलं पीक आल्याने  संजय साठे आनंदीत होते पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. संजय साठे यांनी 750 किलो कांदा विकला. लासलगावला जेव्हा त्यांनी कांदा विकला तेव्हा त्यांना फक्त 1 रुपये प्रतिकिलोने कांदा विकावा लागला.


29 नोव्हेंबरला संजय साठे यांनी मनी ऑर्डर केला होता. हा मनी ऑर्डर पीएम ऑफिस पोहोचताच एकच खळबळ उडाली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. संजय साठे यांनी माहिती काढण्यात आली. नाशिकच्या कलेक्टर ऑफिसला याची माहिती देण्यात आली. संजय यांनी विचार देखील केला नसेल की त्यांनी रागाच्या भरात केलेल्या गोष्टीचा इतका परिणाम होईल. 


संजय यांनी म्हटलं की, मला प्रांत अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी मला माझं शेत, कांद्याचं उत्पादन आणि त्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांची विचारपूस करण्यात आली. मला वाटलं की यानंतर आता ही गोष्ट संपली. पण यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची देखील चौकशी केली.


नैताली गावचे माजी सरपंच राजेंद्र बोरगुडे यांची चौकशी करत असताना संजय यांचे राजकीय संबंध आहेत का याबाबत देखील विचारपूस करण्यात आली. साठे हे कोणत्याही पक्षाची संबंधित नाहीत. त्यांना संतापाच्या भरात हे पैसे पाठवले. पण आता सरकार कांद्याला चांगला भाव देऊन शेतकऱ्यांना अडचणीत बाहेर काढेल का हा खरा प्रश्न आहे.