मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : आजवर सामान्य नागरिकांचे इमेल्स हॅक झाल्याची अनेक प्रकरणं ऐकिवात येत होती. मात्र, नाशिकमध्ये चक्क प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याचं संकेतस्थळ हॅक करण्यात आलंय. हे संकेतस्थळ हॅक करुन परस्पर परवाने दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची वाटचाल डिजिटल इंडियाच्या दिशेने सुरु आहे. सरकारी कार्यालयात ऑनलाईन कामकाजाचा हट्ट धरला जातोय. ही ऑनलाईन प्रक्रीया सर्वसामान्यांसाठी फायद्याची असली तरी तीची तोट्याची बाजूही समोर येऊ लागलीय. कारण ही डिजिटल प्रणाली किती असुरक्षित आहे, याची प्रचिती नाशिकमध्ये आलीय. नाशिकच्या प्रदेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची वेबसाईट हॅक करून त्या माध्यमातून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 


अधिकाऱ्यांच्या लॉग इन आयडीवरून परस्पर आलाय, अशी माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिलीय.  


पासवर्ड चोरून हा गुन्हा करण्यामागे याच कार्यालयातील एखादी व्यक्ती किंवा एजंट असल्याचा संशय पोलिसांना आहे... तर दुसरीकडे आयटी क्षेत्रातीर तज्ज्ञांनी पासवर्ड देताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.


एकीकडे सरकारी कार्यालयं डिजीडल होत असली तरी सरकारी बाबूंची खाबूगिरी अजून संपलेली नाही. कायमच एजंटच्या विळख्यात अडकलेल्या अशा कार्यालयांना एजंटपासून मुक्त करणंही गरजेचं आहे.वाहनांचे परवाने दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात