मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानात (National Health Mission) मोठी भरती निघाली आहे. विविध पदांसाठी ही भरती (Recruitment) असणार आहे. या भरतीत निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराला महिन्याला तब्बल 1,25,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता या भरतीत अर्ज करा. या भरतीबाबतचा संपुर्ण तपशील खाली दिला गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) हिंगोली जिल्ह्यात काही जागांसाठी मोठी भरती (Recruitment) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख (Last Date) 21 नोव्हेंबर 2022 असणार आहे.


'या' पदांसाठी अर्ज करता येणार 


हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, सर्जन, वैद्यकीय अधिकारी, sts RNTCP, RNTCP-STLS-TB, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक, RSSK कौन्सेलर, RBSK , EMS समन्वयक, सिकल सेल, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, योग थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी यूजी (युनानी), शितसाखळी तंत्रज्ञ , लसीकरण फील्ड मॉनिटर्स 


कागदपत्र आवश्यक 


  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे (Applicant) ग्रॅज्युएशन पर्यंतच शिक्षण आवश्यक आहे.  

  • उमेदवाराचे (Applicant) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.  

  • उमेदवारांना (Applicant) किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 


या पत्त्यावर अर्ज पाठवावा


राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) हिंगोली कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली. 


या भरतीबाबत संपुर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


या भरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.