पनवेल :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदाराने विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय. सुनील तटकरे यांनी फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलंय.  मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं अशा शब्दांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी फडणवीसांची स्तुती केली. पनवेलमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (nationalist congress party mp sunil tatkare praised to lop devendra fadnvis at panvel)


तटकरे काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी फडणवीस यांना अनेकदा सभागृहात सांगत आलोय, की तुम्ही अजूनही विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेतून बाहेरच पडत नाहीत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यात चांगलं काम केलंय, याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. माझ्या रोह्याच्या नगरपालिकेला त्यांनी निधी उपलब्ध करुन दिला", असं तटकरे म्हणाले. 


फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द


दरम्यान फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला. फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस 2 अपक्ष आमदारांना भेटणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. मात्र आता प्रकृती स्थिर नसल्याने फडणवीस मुंबईला परतले. राज्यसभा निवडणुकीसाठी 10 जूनला पार पडणार आहे.