स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई: हल्ली सायबर क्राईमचे (cyber crime cases) गुन्हे वाढू लागले आहेत. अनेक ठिकाणी अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. यावर अद्याप कुठलाही नियंत्रण आलेलं आहे. समाजात अशा विविध घटना घडल्याचं आपण पाहतो. नुकताच असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सतरा वर्षाच्या तरूणानं इंटरनेट वाय-फाय पासवर्ड शेअर न केल्यानं त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे नवी मुंबईतील परिसर हादरला आहे. अशाप्रकारचे गुन्हे तरूणांच्या जीवावर बेतत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेततेचाही प्रश्न उद्भवतो आहे. (Navi Mumbai 17 year old boy stabbed to death by two sweepers for refusing to share wifi password crime news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामोठे (Kamothe) येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांना 17 वर्षीय तरुणाने इंटरनेट वाय-फायचा (Wifi) पासवर्ड (Passward) शेअर करण्यास नकार दिल्याने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कामोठे सेक्टर 14 येथील भर रस्त्यात हा प्रकार घडलाय. आरोपी रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी हे दोघेही सफाई कामगार म्हणून काम करत असून मृत विशाल मौर्य हा बेकरी मध्ये काम करतो. 


विशाल मोर्यने आपला इंटरनेट पासवर्ड देण्यास नकार दिल्याच्या रागातून रवींद्र आणि राज यांनी विशालला रस्त्यात गाठत त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात विशालचा मृत्यू झाला असून कामोठे पोलिसांनी दोघं आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. 


या प्रकरणी अद्याप तपास चालू आहे. सध्या अशा तऱ्हेच्या घटनांमुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांना वेळीच आळा बसला नाही तर तरूण मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उद्भवतो आहे.