नवी मुंबई : नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेल तालुक्यातील १० गावं आणि अनेक टेकड्या नष्ट होणार आहेत. गाढी नदीचा प्रवाह बदलण्यात येणार आहे. या १० गावांमध्ये वाघोली पाडा इथे डोंगराच्या कुशीत लेणी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लेण्यांमध्ये केरूमातेचं मंदिर आहे. ध्यानधारणा कक्षही आहे. निसर्गाच्या सान्निध्यात या लेणी आहेत. २०१३ मध्ये महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाने लेणी पुरातन असल्याचा अहवाल दिला. विमानतळाच्या कामासाठी सुरू असलेल्या ब्लास्टींगमध्ये लेण्यांची पडझड होतेय. काही दिवसांनी या लेणीही तोडण्यात येणार आहे. त्यामुळे या पुरातन संस्कृती नष्ट होणार आहे.


लेणी वाचावी यासाठी भारतीय लेणी संवर्धन समितीनेही प्रयत्न सुरू केले आहेत. पत्रव्यवहार करून सिडको आणि जिल्हाधिका-यांकडे दादही मागितली आहे. मात्र यंत्रणा दाद देत नाहीत.


एकीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा देशाच्या प्रगतीला पूरक प्रकल्प होत आहे. पण त्याचवेळी ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्यापासूनही वाचवणं गरजेचं आहे. यातून काही तोडगा निघेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. लेणी वाचवण्यासाठी इथली तरूण मंडळी त्यासाठी धडपड करत आहेत.