CM Eknath Shinde Get Doctorate Degree : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे डिग्री लागणार आहे. नुसतं एकनाथ शिंदे नाही तर आता डॉक्टर एकनाथ शिंदे म्हणून ते ओळखले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावापुढं डॉक्टर अशी उपाधी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटकडून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.  सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापनातील त्यांचं उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन त्यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. 


डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभा नेरुळच्या डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडला. राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू तथा अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि राज्यपाल रमेश बैस  यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. 


कॉलेज अर्धवट सोडले


9 फेब्रुवारी 1964 रोजी एकनाथ शिंदे यांचा जन्म  झाला.  ठाणे येथील किसननगर क्र. 3 येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. 23 येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.  ठाण्यातीलच मंगला हायस्कूल येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. यानंतर मात्र, घरच्या परिस्थितीमुळे अकरावी नंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र, त्यांना शिक्षण्याची इच्छा होती. यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. मराठी आणि राजकारण या विषयात त्यांनी बीएची परीक्षा दिली. त्यांना 77.25 टक्के गुण मिळाले आहेत.  


रिक्षाचालक, शिवसैनिक, आमदार ते मुख्यमंत्री 


रिक्षाचालक, शिवसैनिक, आमदार ते मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले. 50 आमदार सोबत घेऊन ते शिवसेना पक्षातून बाहरे पडले. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार व्हावे लागले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले आणि नवे शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले.