नवी मुंबई : श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई  महापालिकेचा (Navi Mumbai) २०२०-२०२१ चा १.९ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर (Navi Mumbai Municipal Corporation has presented a balance budget) करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकात ( Navi Mumbai budget ) कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने नवी मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नवी मुंबई महानगरपालिकेचे (Navi Mumbai Municipal Corporation) २०२०-२०२१ चे अंदाजपत्रक ( budget) आज महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांना सादर केला. १.९ कोटींचा शिलकीचा आणि ३ हजार ८५० कोटी रुपयांचा उद्धिष्ट असलेले हे अंदाज पत्रक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अंदाज पत्रकात ४०० कोटींनी वाढ करण्यात आली आहे.



जानेवारी २०२० अखेर ५१२.० कोटी मालमत्ता कराची वसूली करण्यात आली आहे. मार्च २०२० अखेर ७०० कोटी वसूली होईल, अशी पालिकेला अपेक्षा असून, २०२०-२१ या वर्षामध्ये ६३० कोटी जमा होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगररचना विभागात १२५ कोटी वसूली अपेक्षित आहे.


या अर्थसंकल्पात जुन्याच प्रकल्पवर खर्च करण्यात आले असून, पाम बीच सुशोभीकरण, सेंट्रल लायब्ररी, बायोगॅस प्लांट, नवी मुंबई प्रवेशद्वार, क्रीडासंकुल हे नवीन प्रकल्प अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसळ यांनी दिली. 


अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने नवी मुंबईकरांसाठी समाधानाची गोष्ट असणार आहे, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.