Kharghar Turbhe Link Road News In Marathi : स्वत:च्या गाडीने कुठं फिरायचं म्हटलं की सर्वात आधी ट्रॅफीकची भिती असते. त्यातही आता प्रस्तावित उड्डाणपूल, नवीन रस्ते मार्गिका, मेट्रो यामुळे थोडासा काही होईना वाहतुक कोंडीतून सुटका होत आहे. त्यात आणखी भर म्हणजे खारघर तुर्भे लिंक रोडची. मुंबई-ठाण्याहून नवी मुंबईला खारघर किंवा नवी मुंबई विमानतळाच्या दिशेनं जाण्यासाठी बराच वेळ खर्चिक होत होता. मात्र आता खारघर तुर्भे लिंक रोड मुळे मुंबई - ठाण्याहून अवघ्या  30 मिनिटांत अंतर पार करता येणार आहे. ठाणे, बेलापूर, पामबीच आणि शीव पनवेल या मार्गावरील ट्र्रॅफिक कमी करण्यासाठी सिडको महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध विकासकामांचे लोकर्पण केले. यात घणसोली-ऐरोली खाडीपूल,सिडकोचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, विमानतळास जोडणारा पूल, अटल सेतू ते उलेव जंक्शन सागरी मार्गासह खारघर-तुर्भे  जोडमार्गाचा समावेश आहे. यामध्ये तुर्भे ते खारघरपर्यंतच्या भुयारी मार्गाचा अर्थाच बोगद्याचाही समावेश असणार आहे. ही कामे येत्या तीन ते चार वर्षांत पूर्ण होणार आहे. या मार्गांमुळे नवी मुंबईकरतील नागरिकांचा प्रवास सुसाट होण्यास मदत होईल. तसेच या प्रकल्पामुळे  वेळ, इंधनाची बचत, वायू ध्वनी प्रदुषणसुद्धा कमी होण्यासह मदत होणार आहे. 


खारघर -तुर्भे लिंक रोडची काय वैशिष्ट्ये


खारघर-तुर्भे लिंकरोड हा चौपदरी असून याची लांबी साधारण 5.49 किमी असेल. यामध्ये 1.96 किमी लांबीचा बोगदा असणार आहे. तसेच शीव पनवेल महामार्गावर दिवसाला दोन लाखहून अधिक वाहनं धावतात, त्यामुळे वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होत. तसेच मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना या मार्गावरुनच यावं लागतं. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र आता लवकरच या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 


दरम्यान खारघर-तुर्भे लिंक रोड बांधण्यासाठी ऋत्विक प्रोजेक्ट्स व  एव्हरास्कॅन (जेव्ही) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खारघर-तळोजाला नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, एपीएमसी मार्केट, टीटीसी औद्योगिक वसाहत यांना जोडणाऱ्या 5.49 किमीचा खारघर-तुर्भे लिंक रोडचे भुमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. यामध्ये तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक डोंगराखालील 1.76 किमीच्या बोगद्याचाही समावेश आहे. या कामाची चार वर्षाची डेडलाईन दिली असून सुमारे 3.166 कोटी रुपये यावर खर्च होणार आहे.  तसेच घणसोली-ऐरोली दरम्यान सहा पदरी खाडीपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या ठाणे-बेलापूर अंतर कापण्यासाठी 16 मिनिटे लागतात ते  5 मिनिटांवर येणार आहे.